Today’s Horoscope 06 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग-Today’s Horoscope 06 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – शनिवार.

तारीख 06.01.2024.

शुभाशुभ विचार- 12 प. चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 9.00 ते10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – स्वाती 21.23 पर्यंत नंतर विशाखा.

चंद्र राशी – तुळ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – आकाशी )
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात किरकोळ मतभेद होऊ शकतात. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

वृषभ ( शुभ रंग- पिस्ता)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)
व्यापार उद्योगाला चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम असाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

सिंह -( शुभ रंग – केशरी)
ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. काही अति हुशार मंडळी आज भेटणार आहेत आज कमीच बोला.

कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. आज वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट कामे सोपी होणार आहेत. आज तुम्ही पाहुण्यांची उठबस आनंदाने कराल.

तूळ ( शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

वृश्चिक ( शुभ रंग – सोनेरी)
आर्थिक व्यवहारात सतर्क राहिला हवे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. रात्रीच्या प्रवासात सावध रहा. आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

धनु (शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेणार आहेत. संतती कडून महत्त्वाचे समाचार येतील.

मकर- ( शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देऊ शकाल.

कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येऊ शकते. पण हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह धरू नका. स्वतःवर संयम ठेवा ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती नक्की येईल.

मीन ( शुभ रंग- निळा)
आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठ्या आर्थिक व्यवहार उद्यावर ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल आज कोणतेही धाडस नकोच.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.