Sharad Mohol Murder : फिल्मी स्टाईल पाठलाग करीत शरद मोहोळ खून प्रकरणातील आठ आरोपींना अटक

जमीन व पैशांच्या जुन्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती

एमपीसी न्यूज – फिल्मी स्टाईल संशयित मोटारींचा पाठलाग करीत पुणे पोलिसांनी शरद मोहोळ खून (Sharad Mohol Murder) प्रकरणातील आठ आरोपींना सातारा जिल्ह्यातील शिरवळजवळ शस्त्रांसह अटक केली. जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळ याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलिसांनी रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली. कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर आज (शुक्रवारी) गोळीबार (Sharad Mohol Murder) करून आरोपी पसार झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना मोहोळ याचा मृत्यू झाला.

Pune Breaking : लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; भर दिवसा झाला होता गोळीबार

या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 भारतीय दंड संहिता कलम 302, 307, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती .

त्या दरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

सदरचा गुन्हा (Sharad Mohol Murder) हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या /पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.