Pune : समाविष्ट गावांमधील शाळांसाठी शिक्षक भरती

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका (Pune) हद्दीत समाविष्ट झालेल्या शाळांसह जुन्या हद्दीतील शिक्षकांच्या रिक्त 355 जागा भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठीच्या बिंदुनामावलीस अंतिम मान्यता मिळविण्यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमधून सव्वा लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक वर्षात शिक्षक भरती न झाल्याने शिक्षकांची संख्या अपुरी आहे.

Chinchwad : ‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता – देवेंद्र फडणवीस

शिक्षकांअभावी एकाच शिक्षकांवर दोन-दोन वर्गांची जबाबदारी देण्यात आली असून त्याविरोधात पालक, शिक्षकांनी आंदोलनेही केली आहेत. दरम्यान, पुणे महापालिका (Pune) हद्दीत गावे समाविष्ट झाल्यावर त्यांचा विकास होत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे पुणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.