Today’s Horoscope 08 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 08 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

08.03.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष-वसंतोत्सवारंभ.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30. 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 8.53 पर्यंत नंतर कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी )

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करावसं वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील. तुम्ही आज मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)

स्थावर विषयक मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवीन नाती जुळतील. आज काही हुशार मंडळी ही संपर्कात येतील. डोके शांत ठेवायची गरज आहे.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट राहील. काही क्षुल्लक गोष्टींवरून तुम्हाला राग अनावर होईल. महत्त्वाच्या चर्चेत आज आपलेच घोडे पुढे दमटवाल.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येथील अधिकारी वर्गास ऑफिसच्या कामासाठी प्रवास घडतील दुकानदारांनी उधारी उसनवारी आज टाळावी.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)

आनंदी व उत्साही असा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळू शकेल. तुमची अपुरी स्वप्न साकार होतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.

मकर ( शुभ रंग- पांढरा )

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत होईल. मनःशांतीसाठी सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाही.

कुंभ (शुभ रंग – निळा)

आज तुम्ही आपल्या मर्यादित राहिलेले बरे. कोणतेही धाडसाची कामे आज करू नका. सासुरवाडीकडून एखाद्या लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

मीन -(शुभ रंग – आकाशी )

भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा होण्याची शक्यता आहे.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.