Today’s Horoscope 10 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार

10.10.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस. 

आज विशेष- इंदिरा एकादशी.

राहू काळ – दुपारी 03.00 ते  04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा.

चंद्र राशी – सिंह.

————————————

मेष – ( शुभ रंग- मोरपंखी )

काही हौशी मंडळी तर आज कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )

आज कुठेही न जाता घरी मस्त आराम करायचा तुमचा मूड असेल. आईने दिलेले सल्ले योग्यच असतील. आज गृहिणींना मुलांच्या अभ्यासातही डोकवावे लागेल.

मिथुन ( शुभ रंग- निळा )

शेजार्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासच्या प्रवासास निघावे लागू शकते. क्रोधावर लगाम आवश्यक आहे.

कर्क (शुभ रंग- केशरी )

खर्च कितीही वाढला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांना चांगला वाव मिळेल. गायक कलाकारांना आज रसिक मनसोक्त दाद देतील.

सिंह (शुभ रंग- मरून )

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. घाई गर्दीत आज काही चुकीचे निर्णय तुम्ही घ्याल. उपवर असाल तर सुयोग्य स्थळे सांगून येतील.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)

आज संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज दिवस खर्चाचा असल्याने बचत शक्यच नाही आज गरजेपुरतेच अध्यात्मिकही व्हाल.

तूळ ( शुभ रंग- जांभळा )

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत कराल.

वृश्चिक (शुभ रंग- लाल)

आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असणार आहे. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. अति व्यस्त दिवस.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)

कोणतेही नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. व्यवसायात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. आज आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी )

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. सावध राहा आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

कुंभ (शुभ रंग – भगवा)

 आज तुम्ही इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी करणार आहात. एकतर्फी प्रेमास आज होकार मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. वैवाहिक जीवनातील लज्जत वाढेल.

मीन -(शुभ रंग – मोतिया)

 कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती मात्र वसूल होण्याची शक्यता आहे. प्रामाणिक प्रयत्नांना आज दैव नक्कीच साथ देईल.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.