Today’s Horoscope 17 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

17.04.2023.

शुभाशुभ विचार – 16 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – सोम प्रदोष.

राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00. 

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा. 

चंद्र राशी – कुंभ 20.52 पर्यंत नंतर मीन.

———————————

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

व्यवसायात आवक आजही मुबलक राहील. तरीही हाती असलेला पैसा जपून वापरायला हवा. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित खर्चाची तयारी ठेवायला हवी.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

नोकरीच्या ठिकाणी तुम्ही पूर्वी केलेल्या कष्टांचे चीज होईल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील. अधिकारी असाल तर तुमची सहकाऱ्यांमध्ये लोकप्रियता वाढेल.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी )

आज तुमचा देव धर्माकडे ओढा असेल. निस्वार्थी वृत्तीने आज तुम्ही गरजूंना मदत कराल. गृहिणींना आज घरातील थोरा मोठ्यांची मने सांभाळावी लागणार आहेत.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी.)

नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे उल्लंघन करून आज विरोधकांना आयती संधी देऊ नका. ताकही फुंकून प्यावे असा आजचा दिवस असून आज नाकासमोर चालणेच हिताचे असेल.

सिंह (शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल तुमचा आत्मविश्वास व सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. जोडीदाराशी ही आज छान सूर जुळतील कुटुंबीयांच्या सहवासात रमाल.

कन्या ( शुभ रंग- मरून )

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. वरिष्ठ कामगारांच्या योग्य मागण्यांची दखल घेतील. तुमची काही येणी असतील तर ती आज वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ ( शुभ रंग- भगवा )

नोकरदारांना आज त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. एखादा नवीन विषय शिकण्याची संधी चालून येईल. उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा )

कुठेही न जाता आज घरीच आराम करणे तुम्ही पसंत कराल. आज तुम्ही कुटुंबीयांच्या मागण्या पुरवण्यास प्राधान्य द्याल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल.

धनु- (शुभ रंग- मोतिया)

आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. सामाजिक कार्य करणाऱ्यां बद्दल जनतेच्या मनातील आदर वाढेल. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल

मकर ( शुभ रंग- डाळिंबी )

राशीच्या धनस्थानातून चंद्र जात असल्याने खर्च कितीही वाढला असला तरीही पैशाची उणीव भासणार नाही. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव जाणवेल.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल इतरांचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. फारच सडेतोड बोलल्याने काही नाती दुरावली जातील. आज थोडा स्वतःवर संयम ठेवा.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

विदेशाशी संबंधित व्यवसाय आज  तेजीत चालतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काही जणांना आज कदाचित तातडीच्या प्रवासास निघावे लागू शकते.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.