Vadgaon Maval : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठांसाठी मोफत पीएमपीएमएल बस पास वाटप

एम पीसी न्यूज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Vadgaon Maval ) यांच्या जयंतीनिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत पीएमपीएमएल बस सेवा पास वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. वडगाव शहरातील वय वर्षे 60 पूर्ण असणाऱ्या एक्कावन जेष्ठ नागरिकांना प्रतिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत बस सेवेचे पास वाटप करण्यात आले.

 

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव कातवीतील जेष्ठ नागरिकांना आज पीएमपीएमएल बस सेवेचे मोफत पास देण्यात आले.

 

वडगाव मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात जेष्ठ नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या कायमस्वरूपी मोफत बस पास सेवा उपक्रमाचा शुभारंभ केला.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी ग्रा.पं. सरपंच नंदाताई ढोरे, वडगाव रा. काँ. ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन भांबळ, ॲड. शामराव ढमाले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झरेकर, विठ्ठल ढोरे, रा. काँ. युवक शहराध्यक्ष अतुल वायकर, वडगाव रा. काँ. सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, प्रभाग क्रमांक सातचे अध्यक्ष अशिष भालेराव, उद्योजक अजय भवार, किरण ओव्हाळ, विकी कदम आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune : इंग्रजी भाषेचे दास्यत्व स्वीकारणे धोकादायक : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 नेहमी प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत हा बस पास सेवेचा उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिली.
याव्यतिरिक्त वडगाव शहरातील अजून कोणत्याही जेष्ठ नागरिकांना दररोजचा अथवा महिन्याचा पास काढून पाहिजे असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधून शासनाने ठरवून दिलेल्या आवश्यक अशा कागदपत्रांची पूर्तता करून मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत पास घेऊन जावे असे आवाहान नगराध्यक्षांनी वडगाव कातवीतील ज्येष्ठ नागरिकांना ( Vadgaon Maval )  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.