Today’s Horoscope 17 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 17 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख 17.01.2024.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – रेवती.

चंद्र राशी – मीन.
—————————-
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)

मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकलले तर बरे होईल. जास्त लाभाच्या अपेक्षेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. व्यवसायात अनुभवींचे सल्ले जरूर घ्यायला हवेत.

वृषभ – ( शुभ रंग- क्रीम)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून तुमचे मनोबल उत्तम असेल. आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. वाढीव कामे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील.

कर्क – ( शुभ रंग – कर्क)

नोकरी व्यवसायात आज तुम्हाला काही आव्हानात्मक पेचप्रसंग सोडवावे लागतील. घरात थोरांशी मतभेद होतील. आज तुमची धार्मिक विषयात रुची वाढेल.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्या. घरात जोडीदाराची मते विचारात घ्या. मोठ्या रकमेचे व्यवहार जपून करा.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)

आज प्रिय पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. नेतेमंडळी आज सभा गाजवतील. आवक पुरेशी असून आज तुम्ही आपल्या जोडीदाराला एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

तूळ – ( शुभ रंग- केशरी)

आज किरकोळ वाटणारी दुखणीही अंगावर काढू नका. प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोट बिघडू शकते. काही येणी असतील तर मागायला लाजू नका.

वृश्चिक – ( शुभ रंग – राखाडी)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल.

धनु- (शुभ रंग- भगवा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज आईचे सल्ले काम येतील.

मकर- ( शुभ रंग – आकाशी)
कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करायचा तुमचा मूड असेल काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

कुंभ – (शुभ रंग- लाल)

कार्यक्षेत्रात आज तुम्ही अत्यंत सकारात्मकतेने प्रत्येक निर्णय घ्याल. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. आज जोडीदाराचे मन जपाल.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. मन प्रसन्न राहील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.