Today’s Horoscope 19 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 19.11.2023.

शुभाशुभ विचार- क्षयतिथि

आज विशेष – भानू सप्तमी.

राहू काळ – संध्याकाळी 04.30 ते  06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – श्रवण 22.49 पर्यंत, नंतर धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर.

—————————–

मेष  ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

वृषभ ( शुभ रंग- पांढरा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

मिथुन  ( शुभ रंग- राखाडी)

कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. कार्यक्षेत्रात मोहास बळी पडू नका. अनैतिक कृत्ये प्रतिष्ठेस घातक ठरतील

कर्क  ( शुभ रंग – हिरवा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

सिंह ( शुभ रंग – निळा)

कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

कन्या ( शुभ रंग- मरून)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

वृश्चिक ( शुभरंग – स्ट्रॉबेरी)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवा. आईच्या अज्ञेत रहा.

धनु (शुभ रंग- लाल)

एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. उपवर तरुण-तरुणींना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल.

मकर (शुभ रंग- आकाशी)

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल

कुंभ (शुभ रंग- सोनेरी)

सहकुटुंब एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल उंची वस्त्र खरेदी कराल आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी.

मीन ( शुभ रंग- मोतिया)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता दिसते. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ होईल.

 

 

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.