Today’s Horoscope 24 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…गुरुवार, दिनांक…24 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… चांगला दिवस.
  • आज विशेष …  दुर्गाष्टमी.
  • राहूकाळ…..दुपारी 01.30 ते 03.00
  • दिशा शूल… दक्षिणेस असेल.
  • नक्षत्र… मूळ 18.25 पर्यंत, नंतर ज्येष्ठा
  • आजची चंद्र राशी… धनु.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – तांबडा)
व्यवसायिक मंडळींकडे आज पैशाचा ओघ चांगला राहील. अर्धवट राहिलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. ज्येष्ठ मंडळींचा देवाधर्माकडे ओढा राहील. 


वृषभ(शुभ रंग – मोरपंखी)
कामाचा व्याप अति महत्त्वाकांक्षा यामुळे तुम्ही काहीसे सैरभैर व्हाल. आज खरंतर कुटुंबासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

 

मिथुन(शुभ रंग – हिरवा)
आज प्रिय आप्तस्वकीयांसह मौजमजेत दिवस व्यतीत होईल. जोडीदारास आज एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल. आज आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका.

 

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
नोकरदारांना आज वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. तुमचे कार्यक्षेत्रातील पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीचा योग संभवतो.

 

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
प्रचंड उत्साहात आज दिवसाची सुरुवात होईल. आज अचानक तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीचा कॉल येईल. उच्चशिक्षित मंडळींना अपेक्षित नोकऱ्यांचे प्रस्ताव येथील.

कन्या(शुभ रंग – पिस्ता)
आज तुमच्या गृहसौख्यात वृद्धी होणार आहे. मागण्या पूर्ण केल्याने बच्चे कंपनी खुश असतील. आज मातोश्री कडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे.


 

तूळ – (शुभ रंग – भगवा)
काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे बेत असतील. आज तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल.  मुले आज आज्ञेत असतील.


वृश्चिक
– (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्या राशीच्या धनस्थानातील चंद्र धनाची वृद्धीच करणार आहे. गृहिणींना काटकसर करण्याची अजिबात गरज नाही. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

 

धनु – (शुभ रंग – निळा)
आज तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. एखादी हरवलेली वस्तू परत शोधली तर सापडेल.

 

मकर – (शुभ रंग – मोतिया)
मनसोक्त खर्च केला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. काहीजण आज सहकुटुंब जवळपासच्या प्रवासाचा आनंद घेतील. आज कायद्यात रहाल तरच फायद्यात राहाल.

 

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)
राशीच्या लाभात असलेला चंद्र तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यास समर्थ आहे. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील. काही भाग्यवंतांना नव्या घराचा ताबा मिळेल.

 

मीन – (शुभ रंग – जांभळा)
कार्यक्षेत्रात आज तुम्ही केवळ चर्चेपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेत रहावे.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.