Today’s Horoscope 25 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

25.04.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- आद्य श्री शंकराचार्य जयंती.

राहू काळ – दुपारी 03.00  ते 04.30 .

दिशा शूल- उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- तांबडा )

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

आज तुम्ही गोड बोलून तुमच्या विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. काही दुरावलेली नाती आज जवळ येतील.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. आज कोणालाही मोफत सल्ले वाटप करू नका.

कर्क (शुभ रंग-मोतिया)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास सापडेल.

सिंह (शुभ रंग- सोनेरी )

कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही होईल. लांबच्या प्रवासात आज बेसावध राहू नका.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी )

आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची आज तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधणे गरजेचे आहे.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. वरिष्ठांचे काहीही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

धनु- (शुभ रंग- मरून)

केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांती ही गरजेची आहे.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. आज शब्द जरा जपून वापरा.

कुंभ (शुभ रंग – केशरी)

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील.

मीन -(शुभ रंग – पिस्ता )

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क- 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.