Chakan : साईबाबा पतसंस्थेची निवडणूक वादात; मध्यरात्री मतमोजणी स्थगित

बॅग मधून मतमोजणी केंद्रावर बोगस मतपत्रिका

एमपीसी न्यूज- साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेसाठी(Chakan ) रविवारी ( दि. 23  एप्रिल ) चाकण (ता. खेड) येथील श्री शिवाजी विद्यालयात मतदान झाले. मात्र सायंकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर बोगस मतपत्रिका येथे आढळून आल्याने एकाच गोंधळ उडाला. संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया प्रशासनाला हाताशी धरून बोगस पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मतमोजणी थांबविण्यात आली .

 

काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बोगस मतपत्रिका बाजूला काढून आजच उर्वरित मतपत्रिकांची मोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार आहे. रात्री बाराच्या सुमारास पुन्हा मतमोजणी सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र एका गटाकडून यास कडाडून विरोध करण्यात आला. साईबाबा पतसंस्था निवडणूक मतमोजणी प्रक्रिया करावी अशी मागणी एक पॅनल करत असताना दुसऱ्या पॅनलद्वारा 500 बोगस मतदान मतपत्रिका मतमोजणी केंद्रावर सापडल्याने मतमोजणी स्थगित करावी अशी जोरदार मागणी करत होते.

यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी धारवाड हे बोगस मतपत्रिका बाजुला काढून मतमोजणी करणार यावर ठाम होते.  हा वाद मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिला. मतमोजणी केंद्रांच्या बाहेर मोठा जमाव ठाण मांडून होता. रात्री दोनच्या सुमारास अनिल सोनवणे, अमोल घोगरे, युवराज काळडोके, देवेंद्र परदेशी, अनिल देशमुख, ज्योती गरुड, चाकण काँग्रेस शहराध्यक्ष आनंद गायकवाड यांचेद्वारा ही प्रक्रिया थांबवा किंवा आम्हाला अटक करून मग प्रक्रिया सुरु करा अशी मागणी करण्यात आली.

Today’s Horoscope 25 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

बोगस मतदानात अधिक मते असलेल्या विरोधी पॅनलने मतमोजणी पूर्ण करण्याचा आग्रह धरला.  जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲड.निलेश कड पाटील यांना मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या केंद्रात जाऊन कायदेशीर युक्तिवाद केल्यानंतर आणि मतमोजणी केंद्रातील एका गटाचा जोरदार आक्षेप आणि बाहेरील जमावाचा रेटा यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी धारवड यांनी मतमोजणी प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

 

दरम्यान संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबण्यात आली असून या बाबत चाकण पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याचे या निवडणुकीतील उमेदवार अनिल सोनवणे, अमोल घोगरे, युवराज काळडोके, देवेंद्र परदेशी, अनिल देशमुख, ज्योती गरुड आदींनी सांगितले. दरम्यान काही जणांनी संपूर्ण प्रशासन हाताशी धरून आणि मोठी आर्थिक तडजोड करून हा प्रकार केल्याची जोरदार चर्चा आहे. बोगस मतपत्रिका मोजणीच्या ठिकाणी येऊन देखील मतमोजणी करण्यासाठी आग्रह धरणाऱ्या यातील दोषींवर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष (Chakan ) लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.