Today’s Horoscope 26 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग  Today’s Horoscope 26 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख 26.12.2023.

शुभाशुभ विचार- 18 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – श्री दत्तात्रेय जयंती.

राहू काळ – दुपारी o3.00ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – मृग 22.21 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – वृषभ 9.57 पर्यंत नंतर मिथुन.
—————————–
मेष – ( शुभ रंग – पिस्ता )
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

वृषभ ( शुभ रंग- मोतिया)
गोड बोलून आज तुम्ही विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून द्याल. धंद्यात येणे अनपेक्षित पणे वसूल होइल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवेत.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती कदाचित आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. विदेशाशी संबंधित व्यवसाय आज चांगले चालतील.

सिंह -( शुभ रंग – पांढरा)
आजच्या दिवसातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध असावे. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरीत वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्यच सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा व कर्तव्यास प्राधान्य द्या.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)
नोकरी धंद्यात आज काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा प्रयत्न करू नका. आज झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.

वृश्चिक ( शुभ रंग – निळा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे व्यावसायिक करार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

धनु (शुभ रंग- मोरपंखी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आज एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी करू शकाल.

मकर- ( शुभ रंग – जांभळा)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका पती-पत्नी मधील काही मतभेद आज सामंजस्याने मिटू शकतील.

कुंभ – (शुभ रंग- डाळिंबी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

मीन ( शुभ रंग- गुलाबी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास गती येईल. कार्यक्षेत्रात तुमची मते इतरांना पटू लागतील. स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आज आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.