Today’s Horoscope 26 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – गुरुवार.

26.10.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष-प्रदोष..

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र -पूर्वा भाद्रपदा 11.27 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रापदा.

चंद्र राशी – मीन.

————————————

मेष  ( शुभ रंग- जांभळा )

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. आज सत्संगातूनच मनशांती मिळेल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होणार आहे.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी आज अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळून कायद्याच्या चौकटीतच राहिलेले बरे.

कर्क (शुभ रंग- मोतिया )

नोकरी धंद्याच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरदारांनी इतरांच्या भानगडीत न डोकावता फक्त आपले काम बिनचूक करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सिंह (शुभ रंग- तांबडा)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने नवे उपक्रम उद्यावरच ढकला. पती-पत्नी मधील वादावर आज मौन हा रामबाण उपाय राहील.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

कार्यक्षेत्रात वावरताना आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

ध्येयप्राप्ती साठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर आज मागायला लाजू नका. गृहिणीसाठी अति व्यस्त दिवस असून आज आरोग्याच्या तक्रारीची वेळीच दखल घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल. नोकरदार मंडळी वरिष्ठांच्या लहरी सांभाळतील.

धनु (शुभ रंग- डाळिंबी)

आनंदी व उत्साही दिवस असून आज सगळी कामे सुरळीत पार पडतील. गृहिणींना गृह उद्योगातून सांगली मिळकत होईल. कलेच्या क्षेत्रातील नवोदीताना स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.

मकर ( शुभ रंग- निळा)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणाच वाटेल.

कुंभ (शुभ रंग – क्रीम )

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल.

मीन (शुभ रंग – पांढरा )

महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर अडून बसाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. आज सुसंवाद साधणे हिताचे राहील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.