Pune : पुणे रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा कक्षाची सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकावर आपत्कालीन ( Pune) वैद्यकीय सुविधा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन डॉ. पी. जी. ग्रांट यांच्या हस्ते बुधवारी (दि. 25) झाले.

यावेळी पुणे विभागाच्या रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन. के. संजीव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाइजी, वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर, रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे ( Pune) व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा कक्ष निर्माण करण्यात आला. इमर्जन्सी मेडिकल फॅसिलिटी रूम हे प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या

सर्क्युलटिंग एरिया (सिटी साइड) शेजारी आहे.

Today’s Horoscope 26 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यामध्ये रुबी हॉल क्लिनिकद्वारे वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. रेल्वेतून पडल्याने जखमी होणाऱ्या प्रवाशांना इथे मोफत वैद्यकीय मदत मिळेल. आपत्कालीन वैद्यकीय सुविधा कक्षात ईसीजी, डिफिब्रिलेटर, पुनरुत्थान सुविधा, नेब्युलायझर इत्यादी सुविधा आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लागणारी आवश्यक औषधे येथे उपलब्ध आहेत.

रुग्णाच्या मागणीनुसार येथून रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णाच्या विनंतीनुसार त्याला जवळच्या शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात हलविले जाईल. रेल्वे प्रवाशांशिवाय इतर रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत आकारल्या जाणाऱ्या दरांमध्ये इथे वैद्यकीय सेवा ( Pune)  मिळतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.