Today’s Horoscope 28 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरूवार.

तारीख 28.12.2023.

शुभाशुभ विचार- वृद्धी दिन. 

आज विशेष – गुरुपुष्यामृत 25.05 नंतर.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु 25.05 पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – मिथुन 18.38 पर्यंत नंतर कर्क.

—————————–

मेष – ( शुभ रंग – क्रीम)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

वृषभ- ( शुभ रंग- हिरवा)

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.

मिथुन – ( शुभ रंग- तांबडा)

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल  महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायदा मोडू नका.

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)

हाती असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब आज दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

सिंह -( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस अति उत्तम आहे.

कन्या – ( शुभ रंग- निळा)

भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणेच आज योग्य ठरेल. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे. किरकोळ तब्येतीच्या काही तक्रारी ही दुर्लक्षित करू नका.

तूळ- ( शुभ रंग- राखाडी)

सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. आज सज्जनांचे पाय घराला लागतील. वडीलधाऱ्यांच्या शब्दाचा मान राखा.

वृश्चिक – ( शुभ रंग – पांढरा)

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगायला हवी. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको. नाकासमोर चाला.

धनु – (शुभ रंग- मोरपंखी)

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमान वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

मकर- ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हीतशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आज तब्येत थोडी नरम राहील.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. कलाकारांना विविध संधी चालून येतील.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.