Pune : डंपरच्या चाकाखाली 7 वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू तर नातेवाइकांनी जाळला डंपर

एमपीसी न्यूज : आज दुपारी अडीज वाजेच्या (Pune) सुमारास मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड या ठिकाणी ओव्हरटेक करण्याच्या नादात डंपरच्या चाकाखाली येऊन एका चिमूकल्याचा मृत्यू झाला असून मयत मुलाच्या संतप्त नातेवाइकांनी डंपरला आग लावली.  

या प्रकरणी अक्षय भाडळे (वय 26, रा. उरळी देवाची) यांनी फिर्याद दिली असून डंपर चालक बालाजी पोले (वय 30, रा. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलगा शौर्य सागर आव्हाळे (वय 7 वर्ष, रा – वाधुली, ता हवेली) याचा मृत्यू झाला.

सविस्तर बातमी अशी, की फिर्यादी यांची बहीण 7 वर्षीय शौर्य आणि मुलीला घेऊन दुचाकीवरुन प्रवास करत होते. यावेळी बालाजी याने दुचकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुचाकीवरून 7 वर्षांचा शौर्य गाडीवरून पडून थेट डंपरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. या रागात मयत मुलाच्या नातेवाईकांनी सदर डंपरला आग लावली. सदरची माहिती प्राप्त झाल्यानंतर हडपसर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Pune : वारजे येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्यात आली असून  डंपर ड्रायव्हर यास ताब्यात घेण्यात आले. रोडची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.