Pune : वारजे येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – सालाबादप्रमाणे यंदाही (Pune) श्री दत्त जयंती सोहळा मंगळवारी (दि. 26) उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा मागील 40 वर्षांपासून साजरा करण्यात येत असल्याची माहिती आयोजक किरण बारटक्के यांनी दिली.

दत्त मंदिर वारजे – माळवाडी बस्टॉप शेजारी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या पवित्र दिनाचे औचित्य साधत गेले 40 वर्षे दत्त जयंती साजरी करण्याची अविरत सेवा दत्त महाराज करुन घेत आहेत, असेही बारटक्के म्हणाले.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील फुले महाविद्यालयात वृक्ष लागवड

यावेळी ह.भ.प. नारायण महाराज गोरे यांची कीर्तनाची सेवा झाली. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी आमदार भिमराव तापकीर, वारजे ग्रामस्थ तसेच वारकरी सांप्रदयातील अनेक मान्यवर व मित्र परिवार मंडळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.