Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील फुले महाविद्यालयात वृक्ष लागवड

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खासदार शरद पवार (Chinchwad) यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील विविध महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात वृक्षांची लागवड करण्यात आली.

Pune : मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू ;31 जानेवारीपर्यंत लाभ घेता येणार

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष राहुल आहेर, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, मुख्य प्रवक्ते राहुल नेवाळे, शहर सचिव रिषभ भडाळे, भोसरी अध्यक्ष नितीन मोरे, महाविद्यालय अध्यक्ष अभिषेक कांबळे, पिंपरी विभाग अध्यक्ष ऋतिक गायकवाड, चिंचवड विधानसभा प्रमुख जगदीश गपाट, उपप्राचार्य कला विभाग डॉ. मृणालिनी शेखर, उपप्राचार्य विज्ञान विभाग प्रा. शहाजी मोरे, उपप्राचार्य कॉमर्स विभाग प्रा. अनिकेत खत्री तसेच प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष राहुल आहेर (Chinchwad) व त्यांच्या टीमने शरद पवार यांच्या वाढदिवसापासून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प करत त्याची अंमलबजावणी करत आहेत. त्यानुसार सांगवी येथील बा. रा. घोलप महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी चैतन्य बनकर व संकेत वाघमारे यांच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.