Today’s Horoscope 28 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

28.06.2023.

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते .30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – चित्रा 16.01 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – तूळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

भागीदारी व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार चोख असतील तर बरे. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात केलेली बरी.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )

नोकरीच्या ठिकाणी साहेबांच्या मर्जीत राहाल. तब्येत आज थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच काढू नका.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी)

दुपारनंतर काही किचकट प्रश्न सहजच सुटतील. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. आज गृहिणी घर सजावटीस प्राधान्य देतील.

सिंह (शुभ रंग- सोनेरी )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

तूळ ( शुभ रंग- हिरवा)

नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्या मनासारख्या काही घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. आज वाहन चालवताना ओव्हरटेक करू नका.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकललेले बरे. आज ज्येष्ठांची पावले आपोआप सत्संगाकडे वळतील.

धनु- (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मोठा भाऊ योग्य सल्ले देणार आहे.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

कुंभ (शुभ रंग – केशरी )

कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरलात तर तुमच्याच अडचणी वाढतील.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनातही जोडीदारा कडून फार अपेक्षा नकोत, सामान्य दिवस आहे.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.