Today’s Horoscope 29 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

29.04.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.                             

राहू काळ- सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल- पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – आश्लेषा 12.47 पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 12.47  पर्यंत नंतर सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

व्यापार उद्योगाची चक्रे गतिमान होतील महत्त्वाच्या चर्चेत आपली मते इतरांवर लादू शकाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. गृहिणी आज घर सजावटीस प्राधान्य देतील.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली करा. अति आत्मविश्वास ही आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यायला हवी.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मनासारख्या घटना घडतील. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. आज वाहतुकीचे नियम मोडू नका.

सिंह (शुभ रंग- क्रीम )

आजचा दिवस नवीन एखादा उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तितकासा योग्य नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठांची पावले सत्संगाकडे वळतील.

कन्या ( शुभ रंग- लाल )

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात इतरांच्या कामासाठी आज आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेणार आहेत.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)

तुमच्या कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरला तर तुमच्याच अडचणी वाढतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत सामान्य दिवस.

मकर ( शुभ रंग- केशरी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदारीत देण्या घेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात केलेले बरे.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तुमची तब्येत थोडी आज नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच नको.

मीन -(शुभ रंग – भगवा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क-9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.