Wakad : शाहरुख खान टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड, सांगवी, हिंजवडी पोलीस ठाण्यात (Wakad) तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या शाहरुख खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोक्का कारवाई केली आहे.

शाहरुख युनूस खान (वय 29), विकास उर्फ बाळा गोपाळ लोखंडे (वय 26), आनंद किशोर वाल्मिकी (वय 28), जुबेर युनूस खान (वय 22), व्यंकटेश उर्फ विष्णू धर्मा कांबळे वय 21, सर्व रा. काळाखडक, वाकड) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Pune : आहो दादा तर रिचेबल होता – अजित पवार 

पोलीस उप आयुक्त स्वप्न गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांवर वाकड, सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबर दुखापत करून जबरी चोरी, साधी दुखापत, खंडणी मागणे, गैर कायद्याची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी मोकाची (Wakad) कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.