Today’s Horoscope 8 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार शुक्रवार 08. 07.2022  (Today’s Horoscope 8 July 2022) 

 

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस

 

आज विशेष – साधारण दिवस

 

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

 

दिशा शूल – पश्चिमेस असेल

 

आजचे नक्षत्र – चित्रा 12.13 पर्यंत नंतर स्वाती

 

चंद्र राशी –  तुळ
________________________
आजचे राशिभविष्य 

 

मेष – ( शुभ रंग – डाळिंबी )
आज आलेल्या प्रत्येक संधीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. आज जोडीदार तुमच्यावर खुश असेल. उपवरांना एखाद्या समारंभात आशेचा किरण दिसेल.

 

 

वृषभ – ( शुभ रंग – राखाडी)
काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे आहे.

 

मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)
नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा, कारण आज जोडीदार तुमची आतुरतेने वाट पाहत असेल. आनंदी दिवस.

 

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)
शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यावसाय तेजीत चालतील. आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. आज मातोश्री आपलेच खरे करतील. खेळाडूंनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

 

सिंह – ( शुभ रंग – मोरपंखी)
कार्यालयीन कामासाठी काही जवळपास चे प्रवास घडणार आहेत. आज झालेल्या प्रवासातील काही ओळखी पुढे व्यवसाय वृद्धिच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

 

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रातील श्रमाचे चीज होईल. दुकानदारांची थकीत बाकी वसूल होईल. तुमची आर्थिक क्षमता वाढणार आहे. मनोबल चांगले असल्याने आज तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

 

तुळ – ( शुभ रंग- मरून)
आज तुमचा लहरी आणि हट्टी स्वभाव जरा काबूत ठेवा. कार्यक्षेत्रात आज काही प्रश्न सामंजस्याने सोडवावे लागणार आहेत. विरोधकांशी मिळतेजुळते घेऊनच स्वार्थ साधावा लागणार आहे.

 

वृश्चिक- ( शुभ रंग- नारंगी)
कंजूषपणा करून काहीही उपयोग नाही. दिवसाच्या उत्तरार्धात असा काही खर्च उद्भवेल कि जो टाळणे शक्य नाही. काही दूरच्या नातलगांची अचानक भेट होईल.

 

धनु – (शुभ रंग- केशरी)
काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होणार आहेत. संततीबाबत काही आनंददायी घटना घडतील. तुमची काही विसरलेली येणी आज वसूल होण्याची शक्यता आहे.

 

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकाराल व त्या सहज पूर्ण कराल. आज तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील.

 

कुंभ- ( शुभ रंग- गुलाबी)
कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. कितीही केलं तरी आज वरिष्ठांचे समाधान  होणे शक्य नाही. नास्तिक मंडळी ही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.

 

मीन – (शुभ रंग- निळा )
विरोधक सक्रिय असताना कामात चुका करून चालणार नाही. आज कोणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही. तरुणांनी गाडी चालवताना स्टंट करू नयेत.

 

 

!! शुभम भवतु!!

 

 

 जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४

 

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.