Today’s Horoscope 30 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग-Today’s Horoscope 30 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – 10 नंतर चांगला.

तारीख 30.12.2023.

शुभाशुभ विचार- 10 नंतर चांगला.

आज विशेष – संकष्ट चतुर्थी. ( चंद्रोदय 21.05)

राहू काळ – सकाळी 9.00ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.


मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ ( शुभ रंग- लाल)
कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.

कर्क – ( शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.

सिंह -( शुभ रंग – चंदेरी)
आज घरात वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागतील. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)
आज काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. प्रिय मित्र मैत्रिणींच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होऊन बसेल.

वृश्चिक ( शुभ रंग – निळा)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेकही नुकसानाला कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

धनु (शुभ रंग- सोनेरी)
कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद होतील. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागण्याची शक्यता आहे.

मकर- ( शुभ रंग – आकाशी)
वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्या कामातील उत्साह पाहून आज तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगलेच सुर जुळतील.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)
आज तुमची तब्येत जरा नरम असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. येणी असतील तर मात्र अनपेक्षित पणे वसूल होतील. हीतशत्रू सक्रिय आहेत, तुम्ही सतर्क रहा.

मीन ( शुभ रंग- मोरपिशी)
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळू शकतो. कलेच्या क्षेत्रात आज नवोदीतांना उत्तम संधी चालून येतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.