Pune : दुचाकी व भुरट्या चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला बेड्या

युनिट चारच्या पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत दुचाकी चोर इसाक शहा याला पकडून बेड्या ठोकण्यात युनिट चारच्या पोलिसांना यश आले आहे.

पुणे शहरात होणा-या दुचाकी चोरी थांबवण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना सराईत गुन्हेगार इसाक शहा हा एकदम सरकारी वाहनाच्या समोर आला. त्याला पोलीस हवालदार राजू मचे यांनी ओळखले. आरोपी इसाक शहा याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या जवळची मोपेड चोरीची असल्याचे निदर्शनास आले. ही मोपेड गाडी खडकी बाजार या भागातून चोरी केली होती. या मोपेड चोरी प्रकरणी  खडकी बाजार येथे गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, शहा याला अटक करून पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.