Chinchwad : रविवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा पिंपरी चिंचवड शहरात येणार

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 6) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. केंद्र शासनाच्या एका कार्यक्रमात ते चिंचवड येथे सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

Maharashtra News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुण्याच्या अथर्व सुदामेचे कौतुक; इंस्टाग्रामवरील विविध कंटेंट क्रियेटर्स यांना प्रोत्साहन

केंद्रीय पंजीयक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. याबरोबरच अमित शहा शुगर फेडरेशनच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी अमित शहा शनिवारी रात्री पुणे शहरात येणार आहेत. रविवारी चिंचवड येथील कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील. केंद्रीय गृहमंत्री येणार असल्याने शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.