Chikhali : शाळेच्या बनावट प्रमाणपत्राद्वारे संस्था चालकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – शाळेच्या मान्यतेचे प्रमाणपत्र बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून संस्था चालकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 4 नोव्हेंबर 2016 ते 14 मे 2019 या कालावधीत अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल बगवस्ती, पाटीलनगर, चिखली येथे घडला.

Chinchwad : रविवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा पिंपरी चिंचवड शहरात येणार

मुकेश दिलीप तिलवाणी (वय 38, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍड विक्रम देशमुख (रा. बाणेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांच्या शाळेचे स्व मान्यतेचे नमुना दोनचे प्रमाणपत्र बनावट तयार केले. त्याचा वापर व्हावा या उद्देशाने ते प्रमाणपत्र फिर्यादी यांना मेल आयडीवर पाठवले.

ते प्रमाणपत्र खरे आहे असे फिर्यादी यांना सांगून फिर्यादी आणि त्यांच्या शाळेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.