Chikhali : सायकलस्वार तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – सायकलवरून जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दोघांनी हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी आठ वाजता शिवतेजनगर, चिंचवड येथे घडली.पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यातील एकाला अटक केली आहे.

Maharashtra News : महाष्ट्रातील सात कलावंताना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान

अरबाज नूर मोहम्मद खान (वय 21, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वप्नील अतुल हेमाडे (वय 21, रा. घरकुल, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास सायकलवरून घरी जात होते. ते शिवतेज नगर येथे आले असता त्यांना फोन आल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबून फोनवर बोलत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून (एमएच 14/एचके 6791) आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील दहा हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.