Talegaon : सराईत वाहन चोरट्यांना अटक; चार दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 21 हजार 500 रुपये किमतीच्या चार दुचाकी  जप्त करण्यात आल्या आहेत.

Chikhali : शाळेच्या बनावट प्रमाणपत्राद्वारे संस्था चालकाची फसवणूक

राहुल दगडू शिंदे (वय 22, रा. वडगाव मावळ), राहुल अंकुश क्षीरसागर (वय 23, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार तळेगाव शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी राहुल शिंदे आणि राहुल क्षीरसागर हे तळेगाव दाभाडे परिसरात येणार आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी तळेगाव दाभाडे परिसरातून चार दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी चार दुचाकी तसेच एका घोरफोडीच्या आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यात चोरलेला टीव्ही आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, सहाय्यक फौजदार दिलीप कदम, पोलीस अंमलदार प्रीतम वाघ, प्रशांत निळे, रघुनाथ बगाड, किशोर गिरीगोसावी, उमाकांत नवगिरे, निखिल देशमुख, विवेक अंभोरे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.