Maharashtra News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुण्याच्या अथर्व सुदामेचे कौतुक; इंस्टाग्रामवरील विविध कंटेंट क्रियेटर्स यांना प्रोत्साहन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra News) विद्यार्थी संघटनेचा 17वा वर्धापन दिन हा मंगळवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मनसे कडून कंटेंट क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी रीलबाज पुरस्कार पदार्पणाचे आयोजन करण्यात आले होते.

नितीन चंद्रकांत देसाई N D : मराठी माणसांने काही भव्य दिव्य केलं कि नकळत आपली छाती गर्वाने फुलुन जाते.

राज्यभरातून आलेल्या विविध इंस्टाग्राम कंटेंट क्रियेटर्स यांच्याशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कंटेंट क्रिएटरचे भरभरून कौतुक केले. हा कन्टेन्ट क्रिएटर दुसरा कोणी नसून पुण्याचा अथर्व सुदामे आहे.

कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना अथर्वला पाहताच राज ठाकरे एकदमच म्हणाले, ” अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहात असतो बरं का”. त्यानंतर राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेला स्टेजवर बोलवलं आणि त्याचं कौतुक केलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, ” तुमच्या कलेमध्ये संपूर्ण समाजाला गुंतवून ठेवण्याची ताकद आहे. समाजाचे सर्व दु:ख विसरून तुमच्या उपस्थितीत आनंद घेण्यासाठी तुमच्याजवळ असलेली ताकद खरोखरच उल्लेखनीय आहे.”

यावेळी पुरस्कार सोहळ्यामध्ये अथर्व सुदामे सह आकाश साळुंखे, प्रकाश मोरे, डॅनी पंडित, दीपराज जाधव, सुमित पाटील, अंकिता वळवळकर, आदित्य सातपुते आधी रिल स्टार्सचा सुद्धा सत्कार करण्यात आला

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.