Pimpri : उन्नतीच्या किल्ले स्पर्धेला मुला -मुलींचा भरघोष प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर  येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या कला गुंणांना व संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी  वाव मिळावी तसेच किल्ला बनवीत असताना किल्यांची संपूर्ण माहिती व्हावी या उद्देशाने हि स्पर्धा घेण्यात आली यात  सुमारे ४५ मुलां मुलींनी  सहभाग घेतला होता . निवडक स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले यात प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले तर उर्वरित स्पर्धकांनाहि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. 

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते प्रथम क्रमांक  दीपमाला सोसायटीतील  सेसा  स्पार्कल्स यांना देण्यात आले. यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती. द्वितीय क्रमांक रोज आयकॉन सोसायटीतील मयंक  लडडा  यांनी  पन्हाळगडाची प्रतिकृती साकारली होती तर तृतीय क्रमांक वेदांत काटे  यांनी भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती अशा तीन स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले .
अनेक मुला मुलींनी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या, हे किल्ले बनविण्यासाठी दगड,माती,विटा,अशा पारंपारिक साधनांचा वापर करून किल्ले साकारण्यात आले होते.
यावेळी संस्थापक संजय भिसे  म्हणाले , मुला मुलींना आपल्या राज्यातील किल्ल्याची माहिती व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील संघटन कौशल्यास प्रोहत्सान मिळावे यासाठी अशा स्पर्धा आयोजित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.