गोरगरिबांसाठी पिंपरी-चिंचवड येथे मिळणार रास्त भावात लाडू-चिवडा

एमपीसी न्यूज – शहर आणि परिसरातील गोरगरीब नागरीकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी मागील 32वर्षांपासून ना नफा ना तोटा या तत्वावर दि पूना मर्चंट्स चेंबरकडून ‘रास्त भावात लाडू-चिवडा विक्री’ उपक्रम राबविला जातो. 

त्यानुसार उद्या म्हणजे मंगळवारी (दि.17) सकाळी दहा वाजल्यापासून पासून पिंपरी-चिंचवडचे केंद्र येथे या लाडू-चिवड्याचे वितरण करण्यात येणार आहे. हे वितरण चिंचवड येथील संभाजीनगर येथील साई अम्ब्रेला गार्डन समोरील श्रीराम जनरल स्टोअर येथे विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी नागरिकांना 99236063 व 9923578908 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच या गुगल लोकेशन : https://g.co/kgs/wQv839 द्वारे विक्री केंद्रापर्यंतही पोहचता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.