सोहम ग्रंथालय येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

एमपीसी न्यूज – ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे व सोहम सार्वजनिक ग्रंथालय, संत तुकाराम नगर,पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन म्हणून सोहम ग्रंथालय पिंपरी येथे साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माननीय किरण सुवर्णा, ग्रंथालयाचे निरीक्षक संगे पाग ,तारक,ढगे, वर्षा जगताप, प्रो.ज्योती झोपे (उपप्राचार्य,डी वाय पाटील पब्लिक स्कूल) ,चिंतामणी ( डी वाय पाटील कॉलेज ग्रंथपाल) अभिजीत गोफण व डी वाय पाटील कॉलेज तसेच दीनदयाळ माध्यमिक विद्यालय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील बहुसंख्य विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी माननीय आमदार आण्णा बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

आमदारांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्य पिंपरी चिंचवड मध्ये आदर्शवत असून वाचन संस्कृतीला चालना देणारे व आदर्श विद्यार्थी व अधिकारी घडवणारे आहे ग्रंथालयात सर्व प्रकारच्या वाचकांना पूरक असे साहित्य उपलब्ध आहे जास्तीत जास्त वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले तसेच प्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तकांची तोंड ओळख होण्यासाठी विविध पुस्तके योग्य पद्धतीने मांडून विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून देण्यात आली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले व नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले ग्रंथालय निरीक्षक संगेपाग यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.