Gaja Marne attested:कुख्यात गुंड गजा मारणे गजाआड, खंडणीच्या गुन्ह्यात होता फरार

एम पी सी न्यूज : कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे याला अखेर अटक करण्यात आली. खंडणीच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अखेर त्याला अटक केली. सातारा जिल्ह्यातील वाई येथून त्याला अटक करण्यात आली. 

गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करून वीस कोटीची खंडणी मागितली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गजानन मारणे याच्यासह 14 जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे. दरम्यान येथील चार जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहे. फरार असणाऱ्यांमध्ये गजानन मारणे याचा देखील सहभाग होता. त्यामुळे गजानन मारणेला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता.

गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने पुण्यातील एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी कारवाई करत चार जणांना अटक केली होती. गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी संघटितपणे गुन्हेगारी करत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित प्रस्तावाची पडताळणी करून गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.