Akurdi: विद्यार्थ्यांचा आठ दिवस वाचनाचा ध्यास

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणानिमित्त विद्यार्थ्यांकडून वाचनाचा ध्यास या उपक्रम उपक्रमांतर्गत सलग आठ दिवस वाचन करुन घेण्यात आले.

वाचन प्रेरणा दिनी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. सकाळी विद्यालयातील वाचन कट्टा यात विद्यालयातील सर्व विद्यार्थीनी पुस्तकांचे वाचन केले. लेखक आपल्या भेटीला यात लेखक डॉ. दिलीप गरुड यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व उलगडले. तसेच या दिवाळीत प्रत्येक विद्यार्थ्यांने दिवाळीत फटाके न वाजविता वृत्तपत्रे व पुस्तके घेण्याचे आवाहन केले.

काही विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावरील माहिती सांगितली. ग्रंथपाल मनिषा साठे यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन प्रतिज्ञा म्हणून घेतली. अमोल गोपाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर, शामला पंडित यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.