Express Way News : द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन (Express Way News) जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला आणि टँकरने अचानक पेट घेतला.

आगीने रुद्र रूप धारण केले. द्रुतगती मार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर ही घटना घडली. आगीचे लोट पुलाखाली देखील पडले. दरम्यान पुलाखालून जाणाऱ्या एका दुचाकीवर हे आगीचे लोट पडल्याने त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर टँकर जवळ एकाचा मृत्यू झाला आहे. आग भिजल्यानंतर टँकर मध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Alandi : कचरा टाकू नये म्हणून स्थानिक नागरिकाने लढवली शक्कल

या घटनेत एकूण चौघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे लोट पुलाखाली पडल्याने मुलाखाली पार्क केलेली वाहने देखील जळून खाक झाली आहेत.

द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा

या घटनेनंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच पुण्याकडे येणारी वाहतूक देखील काही काळ बंद करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दुःख (Express Way News) व्यक्त केले. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

राज्य पोलीस दल, महामार्ग पोलीस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.