Alandi : कचरा टाकू नये म्हणून स्थानिक नागरिकाने लढवली शक्कल

एमपीसी न्यूज – आळंदी येथील मरकळ रस्त्यावरील माऊली पार्कच्या प्रवेशच्या रस्त्यावरच काही  (Alandi )  नागरिक   मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. म्हणून तेथील प्रवेश रस्त्याजवळील स्थानिक नागरिक किरण नरके यांनी कचरा टाकू नये यासाठी फलक लावून विविध वाक्य लिहिली.परंतु कचरा त्या ठिकाणी टाकणे कमी झाले नाही.

Alandi : 11 वर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा दाखल

सदर ठिकाणी त्यांनी व्यवस्थित  दगड बसेल अशी व्यवस्था करत त्या दगडास शेंदूर लावून पुष्पहार घातला आहे. तेथील ती स्थिती पाहून त्या  नागरिकांनी तिथे कचरा टाकणे बंद केले आहे.कचरा टाकू नये यासाठी वापरण्यात आलेल्या या शक्कलेची शहरात मात्र चर्चा सुरू (Alandi )  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.