Alandi : आळंदी मध्ये वै.प. पू.गुरुवर्य कुंभार गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष

एमपीसी न्यूज – वै.प. पू.गुरुवर्य कुंभार गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आळंदी (Alandi) मधील घुंडरे गल्ली मध्ये या सोहळ्याचे अधिक श्रावण आमावस्या दि.16 ऑगस्ट ते निज श्रावण शुद्ध सप्तमी 23 ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

Pune : भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवेल : शरद पवार

या सोहळ्यात पहाटे 4 ते 6 काकडा,सकाळी 6 ते 7 विष्णुसहस्त्रनाम,सकाळी 7 ते 10 श्रीज्ञानेश्वरी पारायण,सकाळी  10 ते दु. 12 गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन , सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ,  सायंकाळी 7 ते रा.9 कीर्तन , भजन असे  दैनंदिन कार्यक्रम  संपन्न होत आहेत.  दि.23 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे

तर ह भ प  चैतन्य महाराज कबिरबुवा, ह भ प रामरावजी महाराज  ढोक,ह भ प महादेव महाराज  राऊत, ह भ प रामभाऊ राऊत यांची या सोहळ्यात कीर्तन सेवा संपन्न झाली असून आज दि.20 रोजी गुरुवर्य ह भ प मारुती बाबा कु-हेकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. दि.21 रोजी हभप किसन महाराज  साखरे ,दि.22 रोजी ह भ प प्रल्हाद महाराज शास्त्रीयांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

हभप सारंगदादा पंडित महाराज  क्षीरसागर या कार्यक्रमाचे निमंत्रक असून वै.गुरुवर्य कुंभार गुरुजी पुण्यतिथी सप्ताप समिती,आळंदी देवाची हे या कार्यक्रमाचे आयोजक आहे. तर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजाभाऊ लक्ष्मण वाघ, महंत लक्ष्मण बाबा फड आहेत. याबाबत माहिती संजय घुंडरे पाटील यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.