Pune : भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवेल : शरद पवार

अजित पवार यांना टोला

एमपीसी न्यूज – आपल्यातील काही सहकार्‍यानी ईडीच्या कारवाईच्या भितीने रस्ता बदलला आणि आज ते भाजपाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. ते सांगतात की, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहोत, आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही.परंतु फक्त तुरुंगात जावं लागू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Pune : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान

राजकारणात किंवा समाजकारणात सत्याची कास सोडून कोणी तरी असं वागत असेल तर माझी खात्री आहे की,आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही.

त्यांना पुढे अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातील (Pune)  कार्यक्रमात सुनावले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘मागील सहा महिन्यात राज्यातील किती कारखाने गुजरातला गेले किंवा अन्य राज्यात गेले. तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्य काढा.परंतु जे कारखाने इथे येणार होते.

ते तिकडे घेऊन जाणे योग्य नाही.या कारखान्यांमुळे येथील तरुणांना कामाची संधी मिळणार होती. पण तुमच्या निर्णयामुळे राज्यात बेरोजगारी वाढली अशा शब्दात राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.