Vadgaon Maval : केशवनगरला जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग लवकर सुरु करण्याची मागणी 

एमपीसी न्युज – वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या भागाला जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर रेल्वेची वाहतूक मोठया प्रमाणावर असल्याने, या ठिकाणी असणारे रेल्वे गेट हे वारंवार जास्त कालावधीसाठी बंदच असते. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील गेट उघडण्याची वाट पाहत थांबून राहावे लागते. (Vadgaon Maval) यासह गेट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे भुयारी मार्गाचे काम लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. ते काम मार्गी लावण्याची मागणी वडगाव भाजपाच्या वतीने मध्य रेल्वेचे डी आर एम इंदुजी दुबे यांना देण्यात आले.

याप्रसंगी शहरअध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव भाजपाचे संघटन मंत्री किरण भिलारे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर,ॲड विजय जाधव, रविंद्र म्हाळसकर,सांगवीचे माजी उपसरपंच काशिनाथ तोडकर,शरद मोरे, हरिष दानवे आदीजन उपस्थित होते.

Pune Fire : पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या ठिकाणी जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहें, सदर पुणे लोणावळा रेल्वे मार्गांवर रेल्वेची वाहतूक मोठया प्रमाणावर असल्याने, या ठिकाणी असणारे रेल्वे गेट हे वारंवार जास्त कालावधीसाठी बंदच असते, या कारणाने येथील ये जा करणारे जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग, बाजार घेण्यासाठी येणारा महिलावर्ग या सर्वांना अपूर्ण असलेल्या कामामुळे नाहक त्रास व वेळेचा खोळंबा होत असताना दिसत आहे.तसेच एखादा रुग्ण आजारी असल्यावर त्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील गेट उघडण्याची वाट पाहत बसावी लागत आहे. त्यामुळे त्याच्या जीवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गेट बंद असल्यावर दोन्ही बाजूला मोठमोठया वाहनांच्या रांगा लागत आहेत.

वरील सर्व बाबींचा विचार करून सदर अपूर्ण राहिलेल्या रेल्वे भूयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून वडगांव मधील केशवनगर व सांगवीला राहणाऱ्या नागरिकांची दळणवळणाची होणारी गैरसोय त्वरित दूर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वडगाव भाजपचे वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.