Pune News : घराबाहेर सिगारेट पिण्यावरून वाद; एकाला हॉकी स्टिक ने मारहाण

एमपीसी न्यूज : घराबाहेर सिगारेट पीत असल्याने त्याचा त्रास होत असल्याचे सांगून एका व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साफरस लाईन या ठिकाणी 14 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. (Pune News) महेंद्र बाबूलाल एलपूर (वय 49) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार श्रीनिवास प्रवीण अयनूर, अनिकेत प्रवीण आयनूर आणि अमित अनंत येलपूर या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी श्रीनिवास आणि अनिकेत फिर्यादी यांच्या चुलत बहिणीची मुले आहेत. हे सर्व खडकी परिसरातील साप्रस लाईन बाजार या ठिकाणी राहण्यास आहेत. दरम्यान 14 जानेवारी रोजी फिर्यादी हे रात्रीच्या वेळी घराबाहेर सिगारेट पीत थांबले होते. (Pune News) यावेळी आरोपी श्रीनिवास त्या ठिकाणी आला आणि तुम्ही सिगारेट पिता त्याचा आम्हाला त्रास होतो असे बोलला. यावर फिर्यादी यांनी मी रस्त्यावर सिगारेट ओढत असून तुला काय प्रॉब्लेम आहे असे सांगितले.

Vadgaon Maval : केशवनगरला जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग लवकर सुरु करण्याची मागणी 

याचा राग आल्याने आरोपींनी आरडाओरडा करत फिर्यादी यांना हॉकी स्टिक घेऊन मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.