Vadgaon Maval : भात खरेदी योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांना (Vadgaon Maval) दिलासा देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून शेती विकास सोसायटींकडून मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून इंद्रायणी भाताची खरेदी केली जात आहे. त्यासाठी शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत 350 टन भाताची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने तालुक्यातील इंद्रायणी भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

मावळ तालुक्यात शेती विकास सोसायट्याकडुन ‘इंद्रायणी’ भात खरेदी योजनेसाठी भात उत्पादक शेतक-यांकडून प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 350 टन भाताची खरेदी झालेली आहे. शेतकऱ्यांना 85 लाख रूपये देण्यात आले आहेत.

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांचे संकल्पनेतून ही हमीभावाने इंद्रायणी भात खरेदी योजना राबविली जात आहे. ही योजना मावळ तालुक्यातील शेती विकास सोसायट्याच्या मार्फत राबवण्यात येत आहे.गावोगावी इंद्रायणी भात खरेदी केंद्रे सुरू केलेली आहेत. तर शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत त्याच दिवशी पैसे देण्यात (Vadgaon Maval) येत असल्याने शेतकरी समाधान आणी आनंदी आहेत

शेतकऱ्यांनी पिकविलेला भात यावर्षी प्रथमच शेती विकास सोसायट्याच्या मार्फत विकत घेतला जात असून तो प्रति किलो 24 रुपये किलो या चांगल्या दराने खरेदी केला जात असल्याने शेतकरी आपला भात थेट सोसायट्याच्या भात खरेदी केंद्रावर आणत आहेत.

Pune News : आज पुणे बंद; ‘असा’ आहे वाहतुकीत बदल!

भाताला उच्चांकी दर

इंद्रायणी भात खरेदीचा सरकारी हमीभाव 20 रुपये 60 पैसे असुन शेतकरी सोसायट्या 24 रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने खरेदी केला जात आहे.

भात खरेदीच्या पहिल्या टप्प्यात नवलाख उंबरे, ताजे, चिखलसे, सुदुंबरे चावसर, उर्से, धामणे, वडेश्वर, निगडे, माळेगांव, बेबेडओहळ, आढले, कार्ला या 13 सोसायट्यांनी भात खरेदी जोरात सुरू केलेली आहे.

यासाठी सचिव संजय ढोरे, धर्मा ठोंबरे, संभाजी केदारी, सुनिल गाडे, रामदास पाठारे, गुलाब ढोरे, उमेश वाडेकर, अंकुश पिंपरकर, रविंद्र हिंगे, तुकाराम लोहोर, सचिन भानुसघरे आदीजण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नीरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भात खरेदीचे काम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.