Pune News : आज पुणे बंद; ‘असा’ आहे वाहतुकीत बदल!

एमपीसी न्यूज : आज पुणे शहर बंद (Pune News) असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आज 13 डिसेंबर रोजी विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या अपमानस्पद वक्तव्याच्या विरोधासाठी शहर बंद व मुख्यमंत्री मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बदल –
(1) लक्ष्मी रोड : सोन्या मारुती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरू झाल्यापासून बेलबाग चौक पास होईपर्यंत )
(2) शिवाजी रोड: स.गो बर्वे चौक ते बेलबाग चौक ( मोर्चा सेवा सदन चौक पास झाल्या नंतर मोर्चा संपेपर्यंत)
(3) बाजीराव रोड: पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक ( मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेप्रमाणे )
(4) गणेश रोड: फडके हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवा सदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेप्रमाणे )
(5) केळकर रोड : अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ( मोर्चा बुधवार चौक इथून पास होईपर्यंत )
(6) 13 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7:00 वाजल्यापासून मोर्चा संपेपर्यंत बेलबाग चौक ते टिळक चौक नो पार्किंग करण्यात येत आहे.
(7) नेहरू रोडवरील नरपत गिरी चौकातून 15 ऑगस्ट चौकाकडे, पॉवर हाऊस चौकातून के ई एम हॉस्पिटलकडे व लक्ष्मी रोडने पीएमपीएमएल बसेसची वाहतूक आवश्यकतेप्रमाणे सेव्हन लव्हज चौक तसेच मालधक्का चौक मार्गे वळविण्यात येईल.

पर्यायी मार्ग : Pune News

मोर्चाच्या कालावधीत वर नमूद मार्गावरील वाहतूक परिस्थिती पाहून आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येत असून वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड व कुमठेकर रोडचा वापर करून इच्छितस्थळी जावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.