Warje Malwadi : हॉटेल मॅनेजरसोबत बोलताना टोळीकडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर (Warje Malwadi) मॅनेजरशी बोलणाऱ्या तरुणाला एका टोळक्याने मारहाण करून त्याच्याकडून पैसे उकळले. त्याशिवाय या टोळीने नागरिकांना क्रॉसबो दाखवून दहशत निर्माण केली.

वाहनांची तोडफोड केल्याची घटनाही शनिवारी (10 डिसेंबर) रात्री 11.30 वाजेच्या सुमारास गणपती माथा परिसरातील दामिनी बार येथे घडली. राजकुमार आनंदे मोरे (वय 39, रा. वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित जटाळ याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेवण झाल्यावर राजकुमार हॉटेलच्या मॅनेजरशी गप्पा मारत बसला होता. त्यावेळी तेथून जात असलेल्या रोहितने साथीदारांना बोलावून राजकुमारला मारहाण केली. त्याने 700 रुपये घेतले आणि मारण्याची धमकी दिली.

Alandi News : चोरांकडून होत आहे मेडिकल शॉप टार्गेट; प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांना निवेदन

त्याशिवाय हॉटेलमधील इतर ग्राहकांना धमकावून दहशत (Warje Malwadi) निर्माण केली. या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पारवे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.