Alandi News : चोरांकडून होत आहे मेडिकल शॉप टार्गेट; प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi News) एसीएम केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनला आळंदी परिसरात चोरांकडून मेडिकल शॉप टार्गेट होत असल्याने त्या प्रकरणाचा छडा लावण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

अलीकडील 3 ते 4 दिवसात आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून मेडिकल शॉप टार्गेट केले जात आहेत. तीन दिवसांपूर्वी संतकृपा मेडिकल दत्तमंदिर रोड , जय गणेश मेडिकल मरकळ रोड, तसेच रविवारी दि.11 रोजी न्यु रामकृष्ण मेडिकल मरकळ रोड ही मेडिकलची दुकाने फोडण्यात आली.

Today’s Horoscope 13 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सीसीटीव्हीमध्ये चोर रिक्षा या वाहनातून (Alandi News) उतरताना, तसेच काहींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. तरी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून योग्य ती कारवाई करावी. या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व एसीएम केमिस्ट अँड ड्रगिस्ट पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याबाबत माहिती सदस्य सचिन गिलबिले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.