Vijay Darda : विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्ली विशेष न्यायालयाने सुनावली चार वर्षांची शिक्षा

एमपीसी न्यूज – छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा (Vijay Darda) खासदार व लोकमत वृत्तपत्राचे अध्यक्ष विजय दर्डा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  विजय दर्डा यांच्या सोबत त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना देखील न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

Pimpri : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे कारावासाची शिक्षा

1999 ते 2005 या कालावधीमध्ये  जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता.

युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.  या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे.

या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याच प्रकरणात त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले (Vijay Darda) आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.