Pimpri : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या (Pimpri) आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने 20 वर्षे कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के पी नांदेकर यांनी हा निकाल दिला आहे. पिडीत मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी सन 2016 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

विक्रम राकेश लांबा (वय 38, रा. दौंड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 50 हजार रुपये ही दंडाची रक्कम पिडीत मुलीला द्यावी. दंड न भरल्यास आरोपीला एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

Pune : रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भातील रेरा मधील नवीन बदल स्वागतार्ह – क्रेडाई पुणे मेट्रो

याबाबत माहिती अशी की, आरोपी लांबा पिडीत मुलीच्या घरी राहत होता. दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय पिडीत (Pimpri) मुलीवर त्याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत हा प्रकार घडला.

21 डिसेंबर 2016 रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. दुसऱ्या दिवशी मुलीने एका मुलाला जन्म दिला. आई अपंग असल्याने तिने याबाबत घरी सांगितले नव्हते.

पिडीत मुलीला सुरुवातीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणि तिथून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वायसीएम रुग्णालयाने याबाबत पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पिडीत मुलीने सांगितलेले आरोपीचे नाव आणि लांबा या दोघांच्या नावात थोडी तफावत होती. त्यातच पिडीत मुलगी कालांतराने जबाब बदलू लागली. दरम्यान, फिर्यादी यांनी लांबा नावाचा आमचा एक दूरचा नातेवाईक असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी विक्रम लांबा, पिडीत मुलगी आणि जन्माला आलेले बाळ यांची डीएनए टेस्ट केली. त्यात विक्रम लांबा हा आरोपी असल्याचे उघड झाले. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

सहायक सरकारी अभियोक्ता मारुती वाडेकर, सरकारी अभियोक्ता संध्या काळे, अरुंधती ब्रह्मे यांनी सरकार पक्षातर्फे (Pimpri) न्यायालयात बाजू मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.