Wakad : आई-वडिलांची संपत्ती नावावर करण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – आई-वडिलांची संपत्ती नावावर करण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वारंवार छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 9 मे 2015 ते 27 ऑगस्ट 2018 दरम्यान वाकड येथे घडला. तसेच माहेरहून 50 हजार रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेसह तिच्या बाळाला देखील मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासरा, सासू, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन याचे फिर्यादी महिलेशी 2015 साली विवाह झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून भांडण होऊ लागले. सासरची मंडळी वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. फिर्यादी यांना भाऊ नसल्याने त्यांच्या आई-वडिलांची संपत्ती सासरच्या लोकांच्या नावावर करण्याची मागणी करत फिर्यादी महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच माहेरहून 50 हजार रुपये आणण्याची वेळोवेळी मागणी करून जर पैसे आणले नाहीत तर फिर्यादी यांच्या बाळाला आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.