Pimpri : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

विद्या अरुण शिनकर (वय 38, रा. वैभवनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या आणि त्यांची जाऊ एकत्र मिळून जेवण करण्यासाठी जात होत्या. पिंपरीतील उज्जीवन फायनान्सच्या ऑफिस समोर दोघी आल्या असता दुचाकीवर आलेल्या दोन चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील सव्वाचार तोळे वजनाचे 1 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.