Wakad : काळाखडक झोपड्पट्टीधारकांचा एसआरए प्रकल्पाला विरोध

एमपीसी न्यूज – काळाखडक झोपड्पट्टीधारकांचा झोपडपट्टी निर्मुलन (Wakad) पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाला विरोध आहे. एसआरए कार्यालयावर ‘संविधान मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

काळाखडक झोपड्पट्टीधारकांच्या वतीने एसआरएचा विरोध करण्यासाठी काळाखडक येथे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात नागरिकांचा विरोध असल्याबाबतचे 500 सह्यांचे पत्र अपना वतन संघटनेचे अध्यक्ष  सिद्दीक शेख यांना देण्यात आले होते. आजच्या बैठकीत नागरिकांनी अनेक अडचणी मांडल्या.

Chinchwad : चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

निरक्षर महिलांना , खोटी माहिती देऊन , भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याचे सांगितले. तसेच पोलीस बाळाचा वापर करून नागरिक , महिला , कार्यकर्त्यांना सोबत  उद्धट वर्तन करून , गुन्हे दाखल करण्याची धमकी देत बेकायदेशीर सर्व्हे करण्यात आला असे सांगितले .

यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले कि, नागरिकांचा SRA प्रकल्पाला विरोध असेल तर , बिल्डर व प्रशासन जबरदस्ती का करत आहे ? कायदा हा लोकांसाठी आहे , त्यामुळे लोकांच्या भावनेचा व मागणीचा विचार झाला पाहिजे . विकसकाकडून कुठल्याही प्रकारची लेखी हमी घेतली जात नाही . पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर प्रकल्प रेटून नेला जातो . त्यामुळे एस आर ए कार्यालयाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढणार असल्याचे यावेळी त्यांनी (Wakad) सांगितले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.